logo

Ahmednagar Breaking : अहमदनगर मध्ये ईडीची सर्वात मोठी कारवाई ! ‘त्यांच्या’ करोडोंच्या मालमत्ता केल्या जप्त

Ahmednagar Breaking : सक्तवसुली संचालनालयान अर्थात ईडी या तपास यंत्रणेचे नाव सर्वश्रुत आहे. सध्या अनेक नेत्यांची चौकशी ईडीमार्फत सुरु असते. दरम्यान आता या ईडीने अहमदनगर जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई केली आहे. मल्टी लेव्हल मार्केटिंग योजनेच्या माध्यमातून करोडोंची फसवणूक झाली असून साधारण ही गुंतवणूकदारांची फसवणूक सुमारे १२५ कोटींची असल्याची माहिती मिळाली आहे
मूळ नगर जिल्ह्यातील रहिवासी व सध्या दुबईत राहणारे विनोद खुटे याच्यावर ही कारवाई झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) व्हीआयपीस् ग्रुप-ग्लोबल अॅफिलिएट बिझनेसचे मालक विनोद खुटे यांच्या कुटुंबीयांशी संबंधित ८ कोटी ९८ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.

यामध्ये पुण्यातील पाच सदनिका, दोन सभागृह, दोन कार्यालये, अहमदनगर येथील जमिनीचा समावेश आहे. याप्रकरणी आतापर्यंत ७० कोटी ८९ लाख रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली असून, चौकशी सुरू आहे. पुण्यातील पाच सदनिका, दोन सभागृह, दोन कार्यालये व अहमदनगर येथील दोन हेक्टर जमीन यावर ईडीने टाच आणली आहे.

2
1147 views